फ्लोअर टेस्टपूर्वीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा; म्हणाले- भाजपला विकास आवडत नाही

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच राजीनाम्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळून सुद्धा राजकीय स्वार्थापोटी भाजपने येथील जनतेला दगा दिला असा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सरकारने राज्यासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच भाजपकडून कशा स्वरुपाचे राजकीय षडयंत्र रचले जात आहे त्याबद्दल आरोप केले. भाजपकडून आमदार फोडण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. आमदार विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. काँग्रेसचे 22 आमदार बंगळुरूला नेऊन चक्क ओलीस ठेवण्यात आले असेही कमलनाथ म्हणाले.